ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानला भारताचं सडेतोड उत्तर
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी काही शांतताप्रिय भारतीय पर्यटक आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. मात्र अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी धर्म विचारून निर्दोष पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक मृत्युमुखी पडले. अनेक स्त्रियांनी आपल्या पतीला गमावलं, आणि त्यांच कुंकू पुसल गेल – ही केवळ हत्या नव्हती, तर भारतीय अस्मितेवर केलेला हल्ला होता.
या घटनेने संपूर्ण देश हादरला. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आणि भारत सरकारने अत्यंत मोजक्या शब्दांत उत्तर दिलं – “ही कृती क्षम्य नाही. उत्तर नक्की मिळेल.”
ऑपरेशन सिंदूरची सुरुवात
६ ते ७ मे २०२५ च्या मध्यरात्री, भारतीय सैन्य दलांनी एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. हे ऑपरेशन दहशतवाद्यांच्या मूळ अड्ड्यांवरच केंद्रित होत – पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलं गेलं. हे कोणतंही निव्वळ प्रतिकार नव्हतं, तर अचूक नियोजन, गुप्तचर माहिती आणि उच्च तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेली स्ट्राईक कारवाई होती.
कोणते भाग लक्ष्य केले?
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकूण ९ ठिकाणी हल्ले करण्यात आले. या सर्व ठिकाणी भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडे आधीपासून खात्रीशीर माहिती होती की तिथे दहशतवादी लोक आहेत.
लक्ष्य केलेली ठिकाणं:
बहावलपूर – मसूद अजहरचा मुख्यालय
मुरीदके – हाफिज सईदचा ठिकाणा
सियालकोट, कोटली, मुजफ्फराबाद, भिंबेर, बाघ – जैश-ए-मोहम्मद व लश्कर-ए-तैयबा चे अड्डे
गुलपूर आणि शकरगढ – प्रशिक्षण कॅम्प्स व लॉजिस्टिक सेंटर
कोणत्या शस्त्रांचा वापर झाला?
घातक ड्रोन (Loitering Munitions) – टारगेट ओळखून स्वतःला विस्फोटात उडवणारे ड्रोन
प्रिसीजन स्ट्राईक मिसाईल्स – दूरवरून अचूक लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली
भारतीय वायुदलाच्या सुखोई, राफेल फ्लीटचा पाठिंबा
हल्ल्याची सर्व माहिती भारतीय गुप्तचर संस्था RAW आणि मिलिटरी इंटेलिजन्स यांनी पुरवली
हल्ल्याचे वैशिष्ट्य
भारतीय लष्कराने अत्यंत संयम राखत केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य केलं. पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणी हानी होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. यामुळे भारताच्या कारवाईचं आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळालं.
पाकिस्तानचं कबुलीजनक उत्तर
पाकिस्तानने सुरुवातीला हल्ला मान्य केला नाही, पण लवकरच ISPR च्या प्रवक्त्यांनी कबूल केलं की भारताने बहावलपूर, कोटली व मुजफ्फराबादमध्ये हल्ले केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही ५ ठिकाणी भारतीय हल्ले झाल्याचं जाहीर केलं. स्थानिक पाकिस्तानी नागरिकांनी देखील मीडियाला माहिती दिली की मसूद अजहरचं मदरसा पूर्णतः उद्ध्वस्त झालं आहे.
ऑपरेशन सिंदूर हे नाव का?
ऑपरेशन सिंदूर नाव हे एक भावनिक व देशाभिमानी संदेश देणारं आहे. पहलगाम हल्ल्यात ज्या नवविवाहित स्त्रिया पतीला गमावून सिंदूर पुसलं गेलं, त्यांचं दुःख आणि आत्मसन्मान याला न्याय देण्यासाठी या कारवाईला “ऑपरेशन सिंदूर” हे नाव देण्यात आलं. ही केवळ लष्करी प्रतिक्रिया नव्हती, तर संस्कृती, सन्मान आणि अस्मिता रक्षणासाठीचा संकल्प होता.
हल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्रसंघ: संयम राखण्याचं आवाहन
अमेरिका (डोनाल्ड ट्रंप): पहलगाम हल्ला लाजीरवाणा होता. भारताच्या कारवाईचं आम्ही समर्थन करतो
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिका, रशिया, यूएई, सऊदी व ब्रिटनमध्ये या कारवाईविषयी स्पष्टीकरण दिलं आणि समर्थन मिळवलं.
आता पुढे काय?
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार सीजफायरचं उल्लंघन सुरू झालं आहे. भारताने वायुदलाची संरक्षण प्रणाली पूर्ण क्षमतेनं कार्यरत केली आहे, तसेच सीमांवर तैनाती वाढवली आहे. कोणतीही आक्रमक हालचाल झाल्यास तत्काळ प्रत्युत्तर देण्यास भारत तयार आहे.
निष्कर्ष:
ऑपरेशन सिंदूर केवळ प्रतिशोध नव्हता – तो न्यायाचा संदेश होता. भारतानं जगाला दाखवून दिलं की, शांतताकामी राष्ट्र असूनही त्याच्या जनतेच्या सन्मानासाठी तो कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांवर नव्हे, तर त्यांच्या संरक्षकांवर देखील होती.
आज देशभरातून एकच आवाज येतोय –
“इन्साफ पूरा हुआ… जय हिंद!”