लाडकी बहीण योजना 11वी हप्त्याची तारीख ठरली – कधी येणार खात्यात पैसे, नाव व स्टेटस असं तपासा
माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता कित्येक महिने झाले, आणि दर महिन्याला येणाऱ्या या हप्त्याची सवयच झाली आहे. पण बऱ्याच महिलांच्या मनात एकच प्रश्न होता – “आता पुढचा हप्ता कधी येणार?” त्यावरच सरकारकडून आता मोठी खुशखबर आली आहे.
24 मे 2025 पासून लाडकी बहीण योजनेची 11वी हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आणि एवढच नव्हे – यावेळी काही महिलांना तर एकाचवेळी तब्बल 4500 रुपये मिळणार आहेत. कसं? चला सविस्तर पाहूया.
कधी येणार पैसे? – तारीख ठरली
राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली की लाडकी बहीण योजनेची 11वी हप्त्याची रक्कम 24 मेपासून वितरित केली जाणार आहे. पण हे पैसे एकाच दिवशी सगळ्यांना मिळणार नाहीत.
- पहिला टप्पा: 24 मेपासून सुरू – जवळपास 1 कोटी महिलांना पैसे
- दुसरा टप्पा: 27 मेपासून सुरू – उर्वरित 1 कोटी 41 लाख महिलांना पैसे
- शेवटची मुदत: 31 मे 2025 – सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार
तुम्हाला किती रुपये मिळणार? हे पाहा
परिस्थिती | मिळणारी रक्कम |
---|---|
मागील 9वा आणि 10वा हप्ता मिळाला | ₹1500 (फक्त 11वा हप्ता) |
मागील दोन्ही हप्ते मिळाले नाहीत | ₹4500 (तीन हप्ते एकत्र) |
अशा ज्या महिला आहेत ज्यांना 9 आणि 10 वा हप्ते मिळाले नाहीत, त्यांचं डोकं दुखणंही आता संपणार आहे. कारण यावेळी थकित दोन्ही हप्ते 11व्या हप्त्यासोबतच मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय हवी?
तुम्ही जर ही योजना सुरू केली असेल, किंवा अजून पात्रतेबाबत गोंधळात असाल, तर हे लक्षात ठेवा:
- महिला महाराष्ट्रची रहिवासी असावी
- वय 21 ते 65 वर्षं दरम्यान असावं
- घरात कोणीही सरकारी नोकरीत नसाव
- घरात ट्रॅक्टर चालेल, पण इतर चारचाकी गाडी नको
- वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावं
- स्वतःचं बँक खाते असणं आणि ते आधारशी लिंक असणं आवश्यक
11वी हप्त्यासाठी यादीत तुमचं नाव आहे का? असा करा तपास
- सरकारी वेबसाईट https://ladkibahin.maharashtra.gov.in वर जा
- “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा
- मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
- “Application Made Earlier” > “Application Status” वर क्लिक करा
- जर “Approved” असं लिहिलं असेल, तर तुमचं नाव यादीत आहे आणि हप्ता नक्की मिळणार!
पैसे खात्यात जमा झाले का? – स्टेटस असे तपासा
- वरील वेबसाईटवर लॉगिन करा
- “भुगतान स्थिति” या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
- “Submit” वर क्लिक केल्यावर हप्त्याचं स्टेटस तुमच्यासमोर येईल
बँक खाते व आधार लिंक तपासा
जेव्हा DBT (Direct Benefit Transfer) सुरू असतो, तेव्हाच पैसे बँकेत येतात. जर खातं आधारशी लिंक नसेल, तर पैसे येणार नाहीत. तेव्हा वेळेत हे काम करून ठेवा.
शेवटी एवढंच सांगायचं…
२४ मेपासून ३१ मेपर्यंत तुमचं बँक खातं सतत तपासत रहा. तुमच्या मोबाईलवर SMS येईल, पण खात्यातली एंट्री स्वतः पाहणं जास्त खात्रीचं!
काही अडचण असेल, तर जवळच्या CSC सेंटरला जाऊन माहिती घ्या किंवा वरील अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून तुमचं सगळं अपडेट पहा.
[महत्त्वाची लिंक]
- सरकारी पोर्टल: https://ladkibahin.maharashtra.gov.in