LIC जीवन अक्षय योजना: एकदाच गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा 20,000 पेन्शन!
LIC जीवन अक्षय योजना: जेव्हा आपण आपल्या कामातून निवृत्त होतो तेव्हा आपले नियमित उत्पन्न सुरू नसते त्यामुळे अनेक लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा आपण काम करत असतो त्या काळात पगार वेळेवर येतो, पण निवृत्तीनंतर त्या सवयीने जगणं कठीण वाटू लागत. म्हणूनच आपल्या भविष्यातील खर्चासाठी पैशाच नियोजन करण्यात खूप गरजेचा आहे. आणि अशातच LIC ची ‘जीवन अक्षय’ योजना तुमच्यासाठी आर्थिक आधार बनू शकते.
जीवन अक्षय’ योजना ही एक अशी स्कीम आहे जिच्यामध्ये तुम्ही एकदाच रक्कम गुंतवून आयुष्यभरासाठी नियमित पेन्शन मिळवू शकता. ही योजना खास करून निवृत्त झालेल्या लोकांसाठी, ज्यांना प्रत्येक महिन्याला उत्पन्नाची खात्री हवी असते, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
जीवन अक्षय योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो?
वय मर्यादा: 30 ते 85 वर्षांपर्यंत कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
पॉलिसी प्रकार: सिंगल प्रीमियम, नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग वार्षिकी योजना.
जॉइंट लाइफ ऑप्शन: तुम्ही पॉलिसी स्वतःसाठी किंवा पती-पत्नी दोघांसाठी घेऊ शकता. त्यामुळे दोघांनाही आयुष्यभर निश्चित पेन्शनचा लाभ मिळतो.
किती मिळू शकते पेन्शन?
या योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या आधारे तुम्हाला ठराविक मासिक पेन्शन मिळते.
गुंतवणूक रक्कम | अपेक्षित वार्षिक पेन्शन | मासिक पेन्शन अंदाजे |
---|---|---|
₹1,00,000 | ₹12,000 | ₹1,000 |
₹10,00,000 | ₹1,20,000 | ₹10,000 |
₹40,72,000 | ₹2,40,000 | ₹20,000 |
जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹20,000 पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला सुमारे ₹40.72 लाख इतकी एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
जीवन अक्षय योजनेचे फायदे
एकदाच प्रीमियम: वारंवार भरणा करण्याची झंझट नाही.
आयुष्यभर उत्पन्न: निवृत्तीनंतर सुद्धा मासिक उत्पन्नाची खात्री.
बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण: शेअर बाजार कोसळला तरी पेन्शनवर परिणाम होत नाही.
पर्यायांची लवचिकता: मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनचा पर्याय.
दोघांसाठी सुरक्षा: एकट्याच्या किंवा दोघांच्याही नावाने पॉलिसी घेता येते.
पैसे गुंतवण्याच्या अगोदर लक्षात ठेवा
ही एक दीर्घकालीन योजना आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना भविष्यातील गरजा नीट विचारात घ्या.
ही पॉलिसी एकदाच पैसे भरून घेतली जाते, त्यामुळे संपूर्ण रक्कम तुमच्याकडे उपलब्ध असावी लागते.
पेन्शन सुरू झाल्यानंतर तुम्हाला मूळ रक्कम परत मिळत नाही (अनलेवल पॉलिसीमध्ये), त्यामुळे रिटर्नचा विचार करताना योग्य सल्ला घ्या.
निष्कर्ष
LIC ची जीवन अक्षय योजना ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्याचा एक विश्वासार्ह आणि स्थिर पर्याय ठरतो. एकदाच गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला ₹20,000 पर्यंत पेन्शन मिळवायची संधी खरोखरच फायदेशीर आहे. जर तुम्ही निवृत्तीचे शहाणपणाने नियोजन करत असाल, तर तुम्ही या योजनेचा नक्कीच विचार करू शकता आणि या योजनेत पैसे गुंतवून तुमच्यासाठी मासिक पेन्शन सुरू करू शकता.