WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Vishwakarma Yojana 2025: पारंपरिक कारागिरांना मिळणार 3 लाख रुपये |कारागिरांसाठी सरकारची मोठी संधी!

PM Vishwakarma Yojana 2025: पारंपरिक कारागिरांना मिळणार 3 लाख रुपये |कारागिरांसाठी सरकारची मोठी संधी!

PM Vishwakarma Yojana: भारतामध्ये अनेक पिढ्यांपासून परंपरागत व्यवसाय करणारे कारागीर आणि हस्तकला तज्ज्ञ आजही आपल्या कलेच्या जोरावर कुटुंब चालवत आहेत. मात्र तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना आपला परंपरागत व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2025 ही योजना एक मोठी दिलासादायक ठरली आहे.

या योजनेचा उद्देश देशभरातील पारंपरिक हस्तकला करणाऱ्या कारागिरांना आर्थिक, तांत्रिक आणि कौशल्यवाढीच्या माध्यमातून सक्षम करणं आहे. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती समजून घेऊयात.


PM Vishwakarma Yojana 2025 ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्य माहिती
योजना प्रकार केंद्र सरकारची योजना
लाभार्थी पारंपरिक कारागीर व हस्तकला व्यवसाय करणारे
आर्थिक सहाय्य प्रथम टप्प्यात ₹1 लाख व दुसऱ्या टप्प्यात ₹2 लाख कर्ज (5% व्याजदराने)
ओळखपत्र विश्वकर्मा डिजिटल ID व प्रमाणपत्र
इतर लाभ कौशल्य प्रशिक्षण, टूल किटसाठी मदत, मार्केटिंगसाठी मदत

या 18 पारंपरिक व्यवसायांना मिळणार लाभ

सरकारने योजनेच्या पहिल्या टप्प्यात खालील 18 व्यवसायांचा समावेश केला आहे:

  • सुतारकाम
  • होडी बांधणी
  • चिलखत बनवणे
  • लोहारकाम
  • हातोडी व अवजार बनवणे
  • कुलूप बनवणे
  • सोनारकाम
  • कुंभारकाम
  • मूर्तिकार व पाथरवट
  • चर्मकार (पादत्राणे)
  • मेस्त्री काम
  • टोपल्या/झाडू/चटया तयार करणे
  • पारंपरिक खेळणी बनवणे
  • न्हावी (केशकर्तन)
  • फुलांचे हार बनवणे
  • धोबी
  • शिंपी
  • मासेमारी जाळे विणणे

पात्रता निकष कोणते?

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा
  •  अर्जदाराच वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावं
  • अर्जदार किमान एका यादीतील व्यवसायात कार्यरत असावा
  • पात्र जातींपैकी (140) कोणतीतरी एक असावी
  • संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण किंवा अनुभव आवश्यक

अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. उत्पन्न व जात प्रमाणपत्र
  4. पत्त्याचा पुरावा
  5. पासपोर्ट फोटो
  6. बँक पासबुक
  7. मोबाईल नंबर

PM Vishwakarma योजनेसाठी अर्ज कसा कराल?

  1. CSC केंद्र भेट द्या: सर्वप्रथम जवळच्या CSC (Common Service Center) ला जाऊन तुमचं आधार आणि मोबाईल सत्यापन करून घ्या.
  2. कारीगर नोंदणी: नंतर CSC तर्फे तुमची कारीगर म्हणून अधिकृत नोंदणी केली जाईल.
  3. ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल: त्यानंतर संबंधित माहिती व कागदपत्रं अपलोड करून अर्ज सादर करा.
  4. तीन टप्प्यांत सत्यापन: स्थानिक संस्था, पंचायत व अधिकाऱ्यांद्वारे तुमची माहिती तपासली जाईल.
  5. प्रमाणपत्र व ओळख ID मिळाल्यावर: तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला सरकारी प्रमाणपत्र व डिजिटल ID दिली जाईल.

या योजनेचे फायदे काय?

  • कमी व्याज दराने कर्ज
  • टूल किट खरेदीसाठी प्रोत्साहन
  • व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग मदत
  • ओळख व मान्यता मिळवण्यासाठी प्रमाणपत्र
  • व्यवसाय टिकवण्यासाठी प्रशिक्षण

अधिकृत वेबसाईट व लिंक


FAQ’s

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Q) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे काय?

Ans – ही योजना पारंपरिक कलेवर आधारित व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिक, तांत्रिक आणि प्रशिक्षण स्वरूपात मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

Q) अर्ज करण्यासाठी वय किती असावं लागतं?

Ans – या योजनेसाठी अर्जदाराचं वय किमान 18 वर्ष आणि कमाल 50 वर्ष असावं लागतं.

Q) योजना पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?

Ans – नोंदणीपासून फायदे मिळायला साधारणतः 1 ते 3 महिने लागतात, कारण त्यामध्ये सत्यापन, प्रशिक्षण व प्रमाणपत्र यांचा समावेश असतो.

निष्कर्ष

आजच्या तंत्रज्ञानयुगात पारंपरिक व्यवसायांचा सन्मान राखणं ही काळाची गरज आहे. PM Vishwakarma Yojana 2025 ही योजना कारागिरांनाच नाही, तर आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशालाही बळकटी देते. योजनेचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकता.

Leave a Comment